सुरत – चौथ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने काही सवलती दिल्या असल्या तरीही आता त्याचे तोटे दिसून येत आहेत. मध्यंतरी मद्य विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर त्याच्या एक पाऊल पुढे जात आता सर्वसामान्यांनी तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठीही रांगा लावल्याचे समोर आले आहे.
मद्य विक्रीच्या दुकानांसमोर ज्या प्रमाणे प्रचंड रांगा लागल्या त्याचीच पुनरावृत्ती आता येथे तंबाखूच्या विक्रीलाही परवानगी मिळाल्याने त्यासाठीही येथील दुकानांसमोर रांगा लागल्या आहेत. गुरुवार सकाळपासूनच येथील बाजारात ज्या ठिकाणी तंबाखूची विक्री केली जाते तेथे लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चीत्र होते.
तंबाखू विक्रीची जी दुकाने बंद होती त्या व्यापारी लोकांना जे ग्राहक पूर्वीपासूनच ओळखत आहेत त्यांनी त्यांच्या घरापर्यंतही धाव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून मोठा महसूल मिळत असल्याने सोशस डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला असूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्षच करत असल्याचेही चित्र दिसले.