…आता मनुष्यबळाची चणचण

Madhuvan

पुणे – शहरासह ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रुग्णालयांमध्ये बेड वाढवण्यात आले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आता खासगी रुग्णालयांना आवश्‍यक असलेल्या डॉक्‍टर, नर्सेससह इतर मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी शहरातील खासगी रुग्णालयासोबत चर्चा केली. यामध्ये रुग्णालयातील डॉक्‍टरांनी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर मार्ग काढण्यासाठी विभागीय आयुक्त यांनी आरोग्यविषयक संबंधित असलेल्या विविध संस्था अथवा संघटना यांच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

या संघटनांमध्ये सभासद असलेले डॉक्‍टर, नर्सेच तसेच आरोग्य विषयक काम करणारे कर्मचारी यांना प्रोत्साहन देऊन त्यांना काम करण्यासाठी विनंती करणार असल्याचे विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.