रांजणगाव गणपती -येथील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शिरूरचे तहसीलदार यांनी रांजणगाव येथे भेट देऊन पुणे- नगर महामार्गालगतच्या दुकानदारांना व नागरिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
याप्रसंगी रांजणगाव मंडल विभागाचे मंडल अधिकारी संतोष नलावडे, कामगार तलाठी सतीश पलांडे, ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मास्क न वापरणारे, रस्त्यावर थुंकणारे व दुचाकीवर दोघे-तिघे फिरणारे यांच्यावर कारवाई करुन बारा हजार रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला असल्याचे ग्रामसेवक किसन बिबे यांनी सांगितले.