नवी दिल्ली – ग्राहकाने ऑन लाईन पद्धतीने व्हेज जेवणाची (Veg) ऑर्डर दिली असताना त्याला नॉनव्हेज (non Veg) जेवणची डिलिव्हरी केल्याबद्दल ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म झोमॅटो आणि त्यांचा रेस्टॉरंट भागीदार मॅकडोनाल्डला (McDonald) जिल्हा ग्राहक तक्रारण निवारण मंचाने तब्बल एक लाखाचा दंड ठोठावला आहे.
या आदेशाच्या विरोधात झोमॅटोने (Zomato) वरीष्ठ न्यायालयात आव्हान द्यायचे ठरवले आहे. जोधपुरच्या जिल्हा ग्राहक तक्रारनिवारण मंच ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावला असून खटल्याचा खर्च म्हणून तक्रारदाराला 5,000 रुपये देण्याचा आदेश दिला आहे.
झोमॅटोने सांगितले की ते उक्त आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत सध्याचा खटला शाकाहारी खाद्यपदार्थांच्या जागी मांसाहारी खाद्यपदार्थांच्या कथित चुकीच्या वितरणाशी संबंधित आहे.त्याच्याशी झोमॅटोचा काही एक संबंध नाही आम्ही फक्त डिलिव्हरी करतो आणि सेवेतील कमतरता किंवा चुकीच्या ऑर्डरला संबंधीत रेस्टॉरंट जबाबदार असते.