नवी दिल्ली – झोमॅटो कंपनीने मंगळवारी देशातील शाकाहारी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन एक वेगळी सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सुरुवातीच्या माहितीप्रमाणे शाकाहारी भोजन पुरविणर्या कर्मचार्यांचा गणवेश हिरवा होता. मात्र या विषयावर नागरिकाकडून बरीच टीका झाल्यानंतर झोमॅटो कंपनीने सर्वच कर्मचार्यांचा गणवेश लाल रंगाचा असेल म्हटले आहे. यामुळे भेदभाव होईल असे बर्याच नागरिकांनी कळविल्यानंतर कंपनीने आपला निर्णय बदलला असल्याचे समजले जाते.
Update on our pure veg fleet —
While we are going to continue to have a fleet for vegetarians, we have decided to remove the on-ground segregation of this fleet on the ground using the colour green. All our riders — both our regular fleet, and our fleet for vegetarians, will…
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 20, 2024
आता डिलिव्हरी बॉईज पूर्वीप्रमाणे लाल टी-शर्ट घालतील. झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपंदर गोयल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. गोयल यांच्या मते, कंपनी शाकाहारींसाठी स्वतंत्र फ्लीट (वेगळा डिलिव्हरी बॉय) सुरू ठेवेल. मात्र या ताफ्यात हिरवा रंग वापरला जाणार नाही. तळागाळातील भेदभाव दूर करण्यासाठी कंपनीने हे केले आहे. कंपनीचे सर्व रायडर्स लाल पोशाख परिधान करत राहतील.
India has the largest percentage of vegetarians in the world, and one of the most important feedback we’ve gotten from them is that they are very particular about how their food is cooked, and how their food is handled.
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 19, 2024
पूर्वी ऑर्डरच्या डिलिव्हरी बॉईजसाठी हिरव्या टी-शर्टचा ड्रेस कोड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, जो आता मागे घेण्यात आला आहे. याआधी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने भारतात 100% शाकाहारी आहाराचे पालन करणार्या ग्राहकांसाठी प्युअर व्हेज मोड आणि प्युअर व्हेज फ्लीट लाँच केले आहे. या अंतर्गत झोमॅटोने व्हेज ऑर्डर देणार्यांसाठी हिरवा ड्रेस आणण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय, कंपनीने हे देखील ठरवले होते की व्हेज फूड हिरव्या बॉक्समध्ये आणि नॉनव्हेज अन्न लाल बॉक्समध्ये पॅक केले जाईल.
दीपंदर गोयल यांच्या मते, प्युअर व्हेज मोडमध्ये फक्त शाकाहारी जेवण देणारी रेस्तराँ उपलब्ध असेल. मांसाहारी पदार्थ देणारी रेस्तराँ या मोडमध्ये समाविष्ट होणार नाही. गोयल यांनी नवीन पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमच्या लक्षात आले आहे की आमच्या काही ग्राहकांना त्यांच्या घरमालकांच्या समस्या असू शकतात. आमच्यामुळे असे घडले तर ते चांगले होणार नाही.