Zomato co-founder Akriti Chopra| आयुष्यात मोठे यश मिळवण्यासाठी मेहनत, जिद्द आणि संयम या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अनेकांनी शून्यापासून सुरुवात करत मोठे यश मिळवले आहे, अशाच एका महिला उद्योगपतीची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. झोमॅटोमध्ये कर्मचारी म्हणून सुरू केलेला आकृती चोप्रा यांचा प्रवास सह-संस्थापकापर्यंत पोहचला आहे.
चार्टर्ड अकाउंटंट (CA) असलेल्या आकृती यांनी स्थिर नोकरी सोडून झोमॅटोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या कुटुंबीयांनीही विरोध केला. पण तिला काहीतरी मोठं करायचं होते आणि ही चांगली संधी असल्याचं सांगून तिने आई-वडिलांना पटवून दिले. त्यानंतर त्यांनी मेहनत करू मोठे यश संपादन केले.
कोठे घेतले शिक्षण?
आकृती चोप्राचा जन्म 1988 मध्ये गुरुग्राममध्ये झाला. त्यांनी डीपीएस स्कूल, आरके पुरम, दिल्ली येथून प्राथमिक शिक्षण घेतले आणि त्यानंतर श्री राम कॉलेज फॉर वुमनमधून पदवी प्राप्त केली. 2021 मध्ये त्यांचा 1.63 कोटी रुपये होता. या कंपनीचं मूल्यांकन 5 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
आकृती यांची 2021 मध्ये सह-संस्थापक म्हणून निवड Zomato co-founder Akriti Chopra|
2011 मध्ये त्या झोमॅटोमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. या काळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. 2021 मध्ये त्यांना पदोन्नती देऊन सह-संस्थापक बनवण्यात आले. याआधी त्या फायनान्सच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होत्या. फूड डिलिव्हरी ॲपच्या इन-हाऊस गव्हर्नन्स, जोखीम आणि अनुपालन संघांमध्येही त्यांनी योगदान दिले. झोमॅटोपूर्वी, आकृती यांनी पीडब्ल्यूसीमध्ये चीफ फायनान्शिअल ऑफिसर म्हणूनही काम केलं आहे.
आकृतीला अनेक पुरस्कारांनी केले सन्मानितZomato co-founder Akriti Chopra|
आकृती यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2017 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या ’30 अंडर 30′ यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना 2018 मध्ये ‘वुमन ऑफ द इयर’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. आपल्या कठोर परिश्रमाने त्यांनी कंपनीला भारतातील अग्रगण्य ऑनलाइन अन्न वितरण सेवेत बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.