स्टॉकहोम – ऍलन आस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि ऍन्टन झेलिंजर या तीन संशोधकांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून जाहीर करण्यात आले आहे. “क्वॉन्टम इन्फर्मेशन सायन्स’ च्या क्षेत्रातील संशोधनासाठी ता तिन्ही संशोधकांना नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग “इन्क्रिप्शन’ सारख्या क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचे आहे.
“क्वॉन्टम इन्फर्मेशन सायन्स’ हे अत्यंत वेगाने विकसित होणारे विज्ञान आहे. या विज्ञानशाखेचा उपयोग माहितीचे सुरक्षित हस्तांतरण, क्वॉन्टम कॉम्प्युटिंग आणि सेन्सिंग टेक्नोलॉजी यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्वाचा आहे. या विज्ञान शाखेतील संशोधनाला या क्षेत्रांमध्ये आणखीन वाव आहे.
या विज्ञान शाखेचा उगम क्वॉन्टम मेकॅनिजममध्ये आहे. असे नोबेल कमिटीच्या सदस्या इव्हा ओल्सोन यांनी म्हटले आहे. “कॉन्टम इन्फर्मेशन सायन्स’च्या संशोधनातून वर्तवण्यात आलेल्या भाकितामुळे एका नव्या विश्वाचे दरवाजे उघडले गेले आहेत. एवढेच नव्हे तर आपण मापकांचा अर्थ आपण कसा लावतो, या मापदंडाचा पायाही यामुळे हादरला आहे, असेही ओल्सोन यांनी म्हटले आहे.
ऍलन आस्पेक्ट यांनी क्वांटम सायन्सच्या संशोधनातील महत्वाच्या त्रुटी करण्याठी एक व्यवस्था निर्माण केली. ऍन्ट झेलिंजर यांनी क्वॉन्टम टेलिपोर्टेशन शक्य केले. तर जॉन एफ क्लॉजर यांनी केलेल्या संशोधनामुळे दोन “फोटोन’मधील आदान प्रदान प्रक्रिया सुकर झाली, असेही नोबेल कमिटीने म्हटले आहे.