Nobel Prize – जगभरातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ‘नोबेल पारितोषिक’ (Nobel Prize) समजलं जातं. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आज पासूनच नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) घोषणा सुरु झाली आहे.
कोविड-19 वरील “एम-आरएनए’ लस विकसित करण्यासाठी हंगेरीचच्या सागान विद्यापिठातील प्राध्यापिका कॅटालिन कारिका (Katalin Kariko) यांच्यासह त्यांचे पेनसिल्वेनिया विद्यापिठातील सहयोगी प्राध्यापक सहकारी ड्रयू वेसमन (Drew Weissman) यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
BREAKING NEWS
The 2023 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded to Katalin Karikó and Drew Weissman for their discoveries concerning nucleoside base modifications that enabled the development of effective mRNA vaccines against COVID-19. pic.twitter.com/Y62uJDlNMj— The Nobel Prize (@NobelPrize) October 2, 2023
रोगप्रतिकारशक्तीशी “एम-आरएनए’ची प्रतिक्रिया कशी होत असते, याबाबतचे मूलभूत संशोधन या दोघांनी केले आहे. या लसीमुळे मानवी रोग प्रतिकारक शक्ती किती वेगाने सक्रिय होऊ शकते, हे स्पष्ट होऊ शकले आहे.
त्यांचे हे संशोधन अलिकडच्या काळात घातक ठरलेल्या कोविड-19 रोगाला नियंत्रित करण्यासाठी बहुमोल ठरले आहे, असे नोबेल पुरस्कार निवड समितीने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. नोबेल असेंब्लीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी या पुरस्काराची घोषणा केली.