लखनौ – बहुजन समाज पक्षातर्फे उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही बाहुबली उमेदवाराला संधी दिली जाणार नाही अशी भूमिका त्या पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केली आहे. सध्या बहुजन समाज पक्षात असलेला बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याला मऊ मधून उमेदवारी दिली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एमआयएम पक्षाने मुख्तार अन्सारीला उमेदवारी देऊ केली आहे. मायावती यांच्या या भूमिके नंतर एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा मुख्तार अन्सारी यांनी आपल्या पक्षातर्फे उमेदवारी देण्याची ऑफर दिली आहे.
मऊ मधून आमच्या पक्षातर्फे भीम राजभय हे निवडणूक लढवणार आहेत अशी घोषणाही मायावती यांनी केली आहे. आम्ही कोणत्याहीं माफियाला यापुढे उमेदवारी देणार नाही असेही मायावती यांनी ट्विटरदारे नमूद केले आहे.