नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यभरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टींमध्ये लावलेल्या उपस्थिती म्हणजे केवळ दिखावा असल्याचं म्हंटलं आहे. याबाबत गिरीराज सिंह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून नितीश कुमारांचे इफ्तार पार्टीतील काही फोटोज शेअर केले असून या फोटोंसोबत त्यांनी, ” कितनी खूबसूरत तस्वीर होती जब इतनी ही चाहत से नवरात्रि पे फलाहार का आयोजन करते और सुंदर सुदंर फ़ोटो आते??…अपने कर्म धर्म मे हम पिछड़ क्यों जाते और दिखावा में आगे रहते है???” असा संदेश देखील लिहिला आहे.
दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी, “गिरीराज सिंह हे या प्रकारची विधान केवळ माध्यमांच्या प्रकाश झोतात राहण्यासाठी करत असतात.” असा आरोप लावला.
कितनी खूबसूरत तस्वीर होती जब इतनी ही चाहत से नवरात्रि पे फलाहार का आयोजन करते और सुंदर सुदंर फ़ोटो आते??…अपने कर्म धर्म मे हम पिछड़ क्यों जाते और दिखावा में आगे रहते है??? pic.twitter.com/dy7s1UgBgy
— Shandilya Giriraj Singh (मोदी का परिवार) (@girirajsinghbjp) June 4, 2019