Nita Ambani : देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी ( mukesh ambani ) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी ( Nita Ambani ) यांच्या कुटुंबाची नेहमीच सर्वत्र चर्चा रंगलेली असते. त्यांची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. कोणताही कार्यक्रम असला, तर अंबानी कुटुंब एकत्र येवून त्या कार्यक्रमाचा आनंद लूटतात.
लग्न कार्यक्रमापासून ते वाढदिवसापर्यंत अंबानी कुटुंबातील अनेक कार्यक्रम मोठ्या थाटात साजरे होतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हीडिओ तुफान व्हायरल होतात. त्यांची प्रत्येक गोष्ट नेहमीच चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका गोष्टी बद्दल सांगणार आहोत.
निता अंबानी ( Nita Ambani ) यांच्याकडे जगातील सर्वात महागडा असा मोबाईल फोन ( Iphone ) असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. पण हे खरं आहे का? नीता अंबानी सर्वात महागडा फोन वापरतात का? या बद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं सत्य काय?
जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी कुटुंबाच नाव सामील होतं. अर्थातच भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी हे नाव आघाडीवर आहे. त्याच बरोबर मुकेश अंबांनी यांची पत्नी नीता अंबानींचं राहणीमान हे नेहमीच त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारं असंच आहे.
त्यांचं राहणीमान, त्यांचे कपडे, आलिशान घड्याळं, ब्रँडेड सँडल, महागडे परफ्युम हे सगळंचं नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, आता त्यांच्या मोबाईल फोनची ( Iphone ) चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. Apple ने 2004 मध्ये हा फोन लाँच केला होता. हा फोन पूर्णपणे 24 कॅरेट सोन्यापासून बनवला आहे.
यावर प्लॅटिनमची कोटींग देखील आहे. त्यामुळे हा फोन पडला तरी तुटणार नाही. या फोनच्या मागे महागडा असा गुलाबी रंगाचा हिरा देखील आहे. हा फोन कोणाही हँक करू शकत नाही आणि जर हॅक करण्याचा प्रयत्न केलाच तर लगेचच त्याचा अलर्ट युजर्सला जातो. म्हणूनच या फोनची किंमत 311 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र, खरंच नीता अंबानी हा फोन वापरतात का? याबद्दल आपण जाणून घेऊ. नीता अंबानींकडे ‘Falcon Supernova iPhone 6 Pink Diamond’ फोन नाही, अशी माहिती रिलायन्सच्या सूत्रांनी दिली आणि ते कोणता फोन वापरतात, याविषयीही माहिती उपलब्ध झालेली नाही, असं वृत्त अनेक माध्यमांनी दिलं आहे.