सॅण्डीयागो – मुमताज खान, अन्नु व दिपीका सोरेंग यांनी केलेल्या अफलातून गोलच्या जोरावर भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघाने कॅनडाचा १२-० असा धुव्वा उडवला. या कामगिरीच्या जोरावर येथे सुरु झालेल्या ज्युनिअर महिला हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सलामी दिली.
भारताच्या महिला संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत कॅनडाचा बचाव अत्यंत सहज भेदत गोलचा वर्षाव केला. अन्नुने ४, ६ व ३९ मिनिटांना गोल केले. मुमताज खानने २६, ४१, ५४ व ६० व्या मिनिटांना गोल केले. दीपीका सोरेंगनेही हॅटट्रिक साधताना ३४, ५० व ५५ व्या मिनिटांला गोल केले. त्यांना सुरेख साथ देताना दीपी टोप्पोने २१ व्या निलमने ४५ व्या मिनिटांना गोल करत संघाच्या विजायत हातभार लावला.
या सामन्यात भारताच्या मुलींनी एकही पेनल्टी कॉर्नर व्यर्थ जाऊ दिला नाही. कॅनडाने अनेकदा प्रयत्न करुनही त्यांना भारताचा भक्कम बचाव भेदता आला नाही. मुमताजने हॅटट्रिकसह तब्बल चार गोल करत आपला फॉर्म कायम राखला.
A blistering start to #TeamIndia‘s 🇮🇳 World Cup campaign as they beat Canada 🇨🇦 by 12 goals in their first game of FIH Hockey Women’s Junior World Cup Chile 2023.#HockeyIndia #IndiaKaGame #RisingStars #JWCChile2023 pic.twitter.com/eOyaYZRRXF
— Hockey India (@TheHockeyIndia) November 29, 2023
अन्नुने हॅटट्रिक साकारली तर, दीपीकानेही ३ गोल करत संघाला मोठा विजय प्राप्त करुन दिला. यंदाच्या स्पर्धेत सलामीच्याच लढतीतडझनभर गोल केलेल्या भारतीय संघाचा पुढील सामना जर्मनीविरुद्ध आज (शुक्रवार) होणार आहे.