“दरोडेखोर लाजतील अशा आमदारांसमोर”, ‘ती’ ऑडिओ क्लिप शेअर करत निलेश राणेंचा रोहित पवारांवर निशाणा

मुंबई : मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या ऑडिओ क्लिप राज्याच्या राजकारणात धुमाकूळ घालत आहे. मंत्री संजय राठोड यांच्या कथिथ क्लिपनंतर आता भाजपनेते निलेश राणे यांनी एक ऑडियो क्लिप शेअर करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  यांच्यावर टीका केली आहे.

या ऑडियो क्लिपमद्ये घरकूलच्या अनुदानावरून चर्चा होत आहे. घरकूलचं अनुदान आले आहे. या संदर्भात रोहित दादांनी बैठक आयोजित केली आहे. कर्जत येथील श्रीराम मंगल कार्यालयात ही बैठक ३ वाजता होणार आहे.  त्यावर समोरची व्यक्ती म्हणते की, घरकूल आम्हाला कर्जत नगरपंचायतने दिले आहे. त्यामुळे येऊ शकत नाही, अस सांगते. त्यावर घरकूल कर्जत नगरपंचायतनेच दिले पण ते आणलेलं रोहित दादांनी आहे, अस त्या व्यक्तीने म्हटले आहे. त्यावर लाभार्थी ने म्हटले की, घरकूल पंतप्रधान योजनेतून आले आहे. त्यामुळे येऊ शकत नाही.

ही ऑडियो क्लिप शेअर करून निलेश राणेंना म्हटले की, दरोडेखोर लाजतील अश्या आमदारांसमोर. अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींमुळे काम झालं नाही तरी चालेल पण शायनिंग पूर्ण झाली पाहिजे ही व्यवस्था आली आहे. मात्र ही ओडियो क्लिपमधील खरच रोहित पवार यांच्याकडून बोलते का, हे सांगणे कठीण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.