‘आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल’

निलेश राणे यांची उद्धव ठाकरेंच्या सुपुत्रांवर टीका

मुंबई – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे जोरदार प्रत्युत्तर दिले. दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी राणेंचा उल्लेख बेडूक असा केला, तर नितेश राणे आणि निलेश राणे यांचा उल्लेख बेडकाची पिल्ल असा केला. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर निलेश राणे यांनी ट्विटरवरून पलटवार केला आहे.

हेही वाचा – मोठी बातमी : अनलाॅक 5.0ची मुदत वाढवली; कंटेन्मेंट झोनमध्ये ‘लाॅकडाऊन’ सुरूच राहणार 

छोट्या फावड्याला वाचवण्यासाठी मोठा फावडा काल इतका बरळत होता की त्याचं त्यालाच कळलं नाही तो काय बोलतोय. ज्यांच्या घरात घाणेरडी लफडी आहेत ते दुसऱ्यांवर गल्लीच्या कुत्र्यासारखे भुंकले. सम्राटाची लफडी महाराष्ट्राला कळली तर ढुंगण लपून महाराष्ट्र सोडावा लागेल, अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल, असेदेखील निलेश राणे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, याआधीही नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, अशी टीका करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.