उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची झाली लागण

पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतल्या ब्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने आज पुन्हा कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. अजित पवारांनी शनिवारी 18 ऑक्टोबरला अतिवृष्टी झालेल्या बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.

अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.मात्र आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यातील एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तर दुसऱ्या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.