Nilesh Lanke । Sujay Vikhe Patil । Rohit Pawar । दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे.
अश्यातच सुजय विखे पाटील यांनी इंग्रजीतून भाषण करण्यासाठी दिलेल्या आव्हानाला नीलेश लंकेंचं प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. निलेश लंके यांनी माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे,
भलेही महिनाभर वेळ घेऊन पाठ करन बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हान अहमदनगर दक्षिण लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी दिलं होतं. । Nilesh Lanke । Sujay Vikhe Patil । Rohit Pawar
या टीकेला निलेश लंके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. “सुजय विखे हे श्रीमंत कुटुंबातील आहेत, ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची अशाच पद्धतीने टिंगल करतील, ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे’ असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिलं.
मात्र, आता प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सुजय विखेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. रोहित पवार म्हणतात की, “लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा,
त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही.
असो! भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो.. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील!” असं रोहित पवार म्हणाले. । Nilesh Lanke । Sujay Vikhe Patil । Rohit Pawar