IPL 2024, Glenn Maxwell : आयपीएल 2024 मध्ये, मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. लखनौने ( Lucknow Super Giants ) हा सामना 28 धावांनी जिंकला.
या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मयंक यादवने त्याला निकोलस पुरनकरवी झेलबाद केले. यासह मॅक्सवेलने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. या लीगमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट झालेल्यांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
मॅक्सवेलला 16व्यांदा आयपीएलमध्ये खातेही उघडता आले नाही. त्याच्या पुढे फक्त रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक ( Most ducks in IPL ) आहेत. रोहित आणि कार्तिक प्रत्येकी 17-17 वेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. त्याचवेळी मॅक्सवेलनंतर मनदीप सिंग, पियुष चावला आणि सुनील नरेन यांचा क्रमांक लागतो. मनदीप सिंग, पियुष चावला आणि सुनील नरेन प्रत्येकी 15-15 वेळा शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : डी-कॉकचे आरसीबीविरुद्ध शतक हुकले, पण नावावर केला ‘हा’ विक्रम…
दरम्यान चालू आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीत अपयशी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत आरसीबीने 4 सामने खेळले आहेत. यादरम्यान मॅक्सवेलनं चेन्नई आणि लखनौ विरूध्द शून्यावर बाद झाला आहे तर पंजाबविरूध्द त्याला तीनच धावा करता आल्या. तर केकेआरविरूध्द त्याने 19 चेंडूत 28 धावांची खेळी केली आहे.