निकोसिया (सायप्रस) – सायप्रसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री निकोस ख्रिस्तोदोफाइड यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ख्रिस्तोदोफाइड यांनी दिग्गज नेते अँड्रीयाज मावरोयियानिज यांचा पराभव केला. मतमोजणी दरम्यान ख्रिस्तोदोफाइड यांना 51 टक्के तर मायरोयियानिज यांना 48 टक्के मते मिळाल्याचे निष्पन्न झाले.
ख्रिस्तोदोफिाड हे 2022 पर्यंत परराष्ट्र मंत्री होते. सायप्रसच्या वांशिक एकीकरणासाठी ख्रिस्तोदोफाइड यांनी आंदोलन केले होते. एकिकरणाच्या मुद्यावरून त्यांनी केलेल्या आवाहनाला देशातील युवकांनी मोठा पाठिंबा दिला आहे.
दुसरीकडे पूर्वी संयुक्त राष्ट्रामध्ये सायप्रसचे राजदूत राहिलेल्या मावरोयियानिज यांनी देशात बदल घडवण्याची आशा दाखवली होती. सायप्रसमध्ये दशकभरापासून निकोस अनास्तासियादेस यांची एकाधिकारशाही होती.
मात्र कम्युनिस्ट पाया असलेल्या “एकेइएल’ या पक्षाने मतदारांना ख्रिस्टोदोफाइड यांच्याकडे वळवले. याशिवाय उजव्या मध्यममार्गी विचारसरणीच्या पक्षांनी आपले बळ ख्रिस्टोदोफाइड यांच्यासाठी वापरले.