मलायक अरोराचे नाइट पार्टी सेलिब्रेशन

मित्रांसोबत पार्टी सेलिब्रेशन असो या फिरण्याची गोष्ट असो, मलायका आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल हे तिला माहिती आहे. मलायकाच्या इंस्टाग्रामवरील फोटोवरुन तरी हे स्पष्ट होते. मलायकाने आपल्या इंस्टाग्रामवर मित्रांसोबतच्या नाइट पार्टीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात करीना कपूरही दिसत आहे.
“छैयां छैयां’ गर्ल मलायकाने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात अनेक मित्रांसोबत ती दिसत आहे. या फोटोत करीना कपूर, बहिण अमृता अरोरा आणि शकील लडक यांच्यासह अन्यजण आहेत. हा फोटो मलायकच्या इमारतीच्या टेरेसवरील आहे. ज्याला कॅप्शन देत मलायकाने लिहिले की, “समर नाइट्‌स…टेरस नाइट्‌स।’ तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात मलायका आणि करीना कपूर फॅशनेबल लुकमध्ये दिसतात. यात मलायकाने रेड टॉप आणि डेनिम, तर करीना डेनिमसह ब्लॅक टॉपमध्ये झळकत आहे.

दरम्यान, मलायका सध्या तिच्या पर्सनल नाईलमुळे सतत चर्चेत असते. अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपनंतर आता दोघांच्या लग्नाबाबत चर्चा रंगत आहे. हे दोघेजण 20 ते 22 एप्रिलदरम्यान ख्रिश्‍चन रिती-रिवाजाप्रमाणे लग्न करणार असल्याची शक्‍यता आहे. पण मलायकाने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.