आनंद आहूजाने बांधली सोनम कपूरच्या बुटाची लेस

गतवर्षी विवाहबंधनात अडकलेले आनंद आहूजा आणि सोनम कपूर हे आपल्या लग्नानंतरचे जीवन इंजॉय करताना दिसून येत आहे. या दोघांचे लवी-डवी फोटो किंवा व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या या दोघांचा एक फोटो इंटरनेटवर खूपच व्हायरल झाला आहे. ज्यात आनंद हे सोनमच्या बूटाची लेस बांधताना दिसत आहे.

सोनम आणि आनंदचा हा फोटो अनेकांनी रिपोस्ट केला आहे. या फोटोत सोनम आणि आनंद यांनी एकसारखे बुट घातलेले दिसत आहे. पण त्यांच्या लेसचा कलर वेगळा आहे. दरम्यान, हा फोटो एका स्टोअर लॉन्चवेळी काढण्यात आला आहे. याप्रसंगी सोनमने मस्टर्ड यलो कलरचा ड्रेस परिधान केला असून तिने आपल्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांचाही असाच एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात धोनी आपल्या बायकोच्या सॅंडलचा बेल्ट लावताना दिसत होता. त्यानंतर धोनी आणि साक्षीवर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आताही सोनम आणि आनंदचा फोटो पाहून चाहत्यांनी लाखो लाईक्‍स्‌ दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.