नवीन पार्टनरसोबत शिल्पा शेट्टीचा जिम वर्कआउट

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेसबाबत ओळखली जाते. आता तिला जिममध्येवर्कआउट करण्यासाठी नवीन पार्टनर मिळाला आहे. शिल्पाने नवीन पार्टनरसोबत वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

शिल्पाचा हा नवीन पार्टनर अन्य कोणी नसून तिचा 6 वर्षांचा मुलगा विवान हा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला असून यात शिल्पा आपल्या मुलाला पायांवर बसवून वर्कआउट करताना दिसते. तसेच विवानही क्‍यूट असा वर्कआउट करताना दिसत येत आहे. विवानचा हा वर्कआउट पाहून अनेकांना हसू अनावर होत आहे.
शिल्पाने हा क्‍युट असा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, पार्टनर वर्कआउट डे. मुलासोबत ट्राइसेप डिप्स (#viaanrajkundra). जेव्हा मुलांना सांभाळण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला जास्त मसल्स आणि ताकदची आवश्‍यकता असते. विशेषता जेव्हा तो मुलगा असतो…उफ्फ!! (सर्व मातांना समजले असेल की मला काय सांगायचे आहे. पण मला प्रत्येक क्षणाचा आनंद मिळत आहे.)

दरम्यान, शिल्पा शेट्‌टी हेल्दी लाइफस्टाईलसाठी ओळखली जाते. ती जीमसोबतच योगा आणि स्ट्रिक्‍ट डायटही फॉलो करत असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.