Global Star Priyanka Chopra – ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनाससोबत अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. आता त्याच्या स्वप्नातील घराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अडचणींचा सामना करत या जोडप्याने घर रिकामे केल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर ज्या व्यक्तीने हे घर त्यांना विकले त्याच्यावर या जोडप्याने खटलाही दाखल केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी हे घर 2019 मध्ये 20 मिलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 166 कोटी रुपयांना खरेदी केले होते. या मालमत्तेतील पाण्याचे नुकसान झाल्याने दाम्पत्य व त्यांच्या कुटुंबीयांची अडचण होत होती. पाण्यामुळे घराच्या विविध भागात ओलसरपणा आणि शेवाळ निर्माण होण्याची समस्या निर्माण झाली होती.
या लक्झरी प्रॉपर्टीमध्ये सात बेडरूम, नऊ बाथरूम, तापमान नियंत्रित वाइन सेलर, शेफचे किचन, होम थिएटर, बॉलिंग ॲली, स्पा आणि स्टीम शॉवर, जिम आणि बिलियर्ड रूम आहे. या जोडप्याने मे 2023 मध्ये घर विकणाऱ्या विक्रेत्यावर खटला दाखल केला होता. यानुसार, मालमत्ता खरेदी केल्यापासून त्याच्या पूल आणि स्पामध्ये समस्या येऊ लागल्या. वॉटरप्रूफिंगच्या अडचणींमुळे घराच्या काही भागांमध्ये शेवाळ आणि इतर समस्या उद्भवल्या.
दरम्यान, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास त्यांची मुलगी मालती मेरीसोबत दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये शिफ्ट झाले आहेत. जोपर्यंत त्यांच्या मालमत्तेची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत ते दोघेही त्यांच्या मुलीसह तेथेच राहणार आहेत. हे जोडपे त्यांच्या कामानिमित्त जगभर फिरतात, पण त्यांचे घर लॉस एंजेलिसमध्ये आहे, जिथे ते राहतात.