हॅमिल्टन : अनुभवी फलंदाज राॅस टेलरची नाबाद शतकी खेळी तसेच हेनरी निकोल्स आणि टाॅम लॅथम यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सलामीच्या लढतीत भारतीय संघाचा ४ गडी व ११ चेंडू राखून पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. राॅस टेलर सामन्याचा मानकरी ठरला.
Tough day at the office but we hope to come back strong next ODI 🇮🇳💪🏻 #TeamIndia #NZvIND pic.twitter.com/CzOfPrVEBF
— BCCI (@BCCI) February 5, 2020
भारताने विजयासाठी दिलेल्या ३४८ धावांचे मोठे लक्ष्य न्यूझीलंडने ४८.१ षटकांतच पूर्ण केले. न्यूझीलंडकडून राॅस टेलरने नाबाद १०९(८४), हेनरी निकोल्सने ७८(८२), टाॅम लथमने ६९, मार्टिन गप्टिलने ३२(४१) आणि मिचेल सॅटनरने नाबाद १२(९) धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर ३४८ धावांचे आव्हान उभारुन देखील भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
There it is! Ross Taylor hits the winning runs off the first ball of the 49th over at @seddonpark. 348/6 in the end with Ross Taylor 109* and Santner 12*. Scorecard | https://t.co/4X8QVMuuLb #NZvIND pic.twitter.com/7R7pOATTzW
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 5, 2020
भारताकडून कुलदीप यादवने १० षटकात ८४ धावा देताना सर्वाधिक २ गडी बाद केले. तर शार्दुल ठाकूर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. ठाकूरने ९ षटकांत ८० धावा देत १ गडी बाद केला. मोहम्मद शमीने ९.१ षटकांत ६३ धावा देत १ गडी बाद केला. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाला विकेट घेण्यास अपयश आले. जडेजाने १० षटकांत ६४ तर बुमराहने १० षटकात ५३ धावा दिल्या.न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावबाद झाले. हेनरी निकोल्सला कोहलीने तरी काॅलिन डी ग्रैंडहोमला अय्यरने धावबाद केले.
Innings Break!
Century from @ShreyasIyer15 and fifties from @imVkohli & @klrahul11 power #TeamIndia to a total of 347/4 after 50 overs.
Scorecard – https://t.co/ewSrnE8I9m #NZvIND pic.twitter.com/znZEa1vMHq
— BCCI (@BCCI) February 5, 2020
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टाॅम लॅथम याने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३४७ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून सलामीवीर पृथ्वी शाॅने २०(२१) आणि मयंक अग्रवालने ३२(३१) धावांची खेळी केली. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने तिस-या विकेटसाठी १०२ धावा जोडल्या. विराटने ६३ चेंडूत ६ चौकारासह ५१ धावा केल्या.
FIFTY!
A composed 58th ODI half-century for @imVkohli 👏👏
Live – https://t.co/ewSrnE8I9m #NZvIND pic.twitter.com/dGM4qw8dnQ
— BCCI (@BCCI) February 5, 2020
त्यानंतर श्रेयस आणि राहुलने डावाची सूत्रे हाती घेत चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या तीनशेच्या जवळपास नेली. श्रेयस अय्यरने कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करताना १०७ चेंडूत ११ चौकार व १ षटकारासह १०३ धावांची खेळी केली.
Here it is!
Maiden ODI 💯 for @ShreyasIyer15 💥💥#NZvIND pic.twitter.com/JgEqaJH0BW
— BCCI (@BCCI) February 5, 2020
त्यानंतर राहुल आणि केदार जाधवने ५ व्या विकेटसाठी शेवटच्या २७ चेंडूत नाबाद ५५ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या ५० षटकांत ३४७ पर्यंत नेली.
KL Rahul joins the party. Brings up his 7th ODI FIFTY off 41 deliveries.
Live – https://t.co/ewSrnE8I9m #NZvIND pic.twitter.com/aq9AvO5rAJ
— BCCI (@BCCI) February 5, 2020
लोकेश राहुलने ६४ चेंडूत ३ चौकार व ६ षटकारासह नाबाद ८८ आणि केदार जाधवने १५ चेंडूत ३ चौकार व १ षटकारासह २६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टिम साउदीने २ तर काॅलिन डी ग्रैंडहोम आणि ईश सोढीने प्रत्येकी १ गडी बाद केला.