कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत
मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कणखर टीका केली. दरेकर आणि कदम यांनी मनसे शिवसेनेच्या वाटेवर येत असल्याचे काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
अमेय खोपकर म्हणाले, “मनसेच्या जीवावर मोठे होऊन ज्यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकला आणि बेडूकउड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी सुरु केली. त्यांनी मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये. पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबातच भीक घालत नाही आणि त्यांच्या सल्ल्याची राजसाहेब आणि आम्हांला काडीचीही गरज नाही”
तसेच विचारधारा वगैरे शब्द दरेकरांच्या तोंडी शोभत नाहीत. सत्तेची ऊब ज्यांना सतत हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कसल्याही तडजोडी करण्याची तयारी असते त्या दरेकरांनी विचारधारेवर बोलणं हा आजचा सर्वात मोठा विनोद असल्याचे खोपकर म्हणाले.
खोपकर यांनी राम कदम यांना देखील चांगलेच सुनावले, “राम कदम यांना जुने दिवस आता आठवत नसतील कदाचित, पण जेव्हा हे मनसेमध्ये होते. तेव्हासुद्धा बाळासाहेबांवर आमची नितांत श्रद्धा होती आणि आजही आहे. मनसे आता शिवसेनेच्या मार्गावर आहे वगैरे बोलून आपली अक्कल पाजळू नका. कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत”
राम कदम यांना जुने दिवस आता आठवत नसतील कदाचित,पण जेव्हा हे मनसेमध्ये होते,तेव्हासुद्धा बाळासाहेबांवर आमची नितांत श्रद्धा होती आणि आजही आहे.मनसे आता शिवसेनेच्या मार्गावर आहे वगैरे बोलून आपली अक्कल पाजळू नका.कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 5, 2020