पंढरपूर – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील बळीराजाच्या सुख संपन्नतेसाठी विठ्ठल चरणी साकडे घातले.
दरम्यान, पंढरपूरमधील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगर लिमिटेडमधील नव्या बायो सीएनजी प्रकल्पाचा शुभारंभ आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यास त्यांनी संबोधित केले.
आज पंढरपूर दौर्यावर असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील बळीराजाच्या सुख संपन्नतेसाठी विठ्ठल चरणी साकडे घातले. pic.twitter.com/7OKElodjSy
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 7, 2023