कोलकाता – आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात दादा म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आपली सामाजिक बांधिलकी किती आहे याचा दाखलाच दिला आहे. येथील करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत मदत केल्यानंतर आता 10 हजार गरजवंतांना दोन वेळचे जेवण पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
देशात लॉकडाऊन असल्याने या लोकांना येथील इस्कॉन केंद्रातर्फे मदत मिळावी व जेवणाचा बंदोबस्त केला जावा यासाठी त्याने रविवारी देखील भेट दिली. त्यात दररोज 10 हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी गांगुलीने आपल्यावर घेतली आहे. त्याने अन्नदानासाठी लागणारे सर्व साहित्य आणि अत्यावश्यक वस्तू देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. याआधी त्याने गरजवंतांना 20 हजार किलो तांदूळ वाटला होता.