आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह – एकूण रुग्णसंख्या 23
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा 23 वर गेला आहे. बुधवारी एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज सकाळी (गुरुवारी) सकाळी एक व आता पुन्हा एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोना बाधितांचा आकडा 23 वर गेला आहे. त्यातील पहिले बारा रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या शहरातील अकरा रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत .
आज सकाळी एका महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महापालिकेच्या वतीने या महिलेच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तर सायंकाळी उशीरा अजून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकाच दिवशी शहरात दोन करोना रुग्णांची भर पडली आहे.
आजपर्यंत शहरात 23 रुग्ण करोना बाधित आढळले आहेत. त्यापैकी 12 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर दहा रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.