‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता

मुंबई – काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे.

विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्याही तयारीत आहेत. विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच विखे पाटील हे काँग्रेसला खिंडार पाडून 10 ते 12 आमदारांना घेऊन भाजपममध्ये जातील अशी माहिती मिळत आहे. यामध्ये आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, नारायण पाटील, सुनील केदार, गोपाळदास अग्रवाल हे विखे यांच्यासोबत भाजपात जाऊ शकतात.

“माझी काँग्रेसमध्ये कोंडी होत आहे असुन आता माझी इथे घुसमट होत आहे. मला अनेक आमदार भेटत आहेत परंतु, त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मी मात्र आज एकटा राजीनामा देत आहे.
-राधाकृकष्ण विखे पाटील

या अगोदर राधाकृष्ण पाटील यांच्या बंगल्यावर एक बैठक पार पडली, या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढाचे खासदार रणजीत निंबाळकर आदींची उपस्थिती होती. या बैठकीनंतरच राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.