पुणे – शहरातील कमाल तापमानात किंचीत घट झाली असली तरी, उन्हाचा चटका कायम आहे. शिरूर तालुक्यात सर्वाधिक 42 तर पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरात 38.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
गेल्या 24 तासाठी शहरातील कमाल तापमानात एक अंशाने घट झाली असली तरी दुपारी 12 ते चारदरम्यान उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. काही भागात ढगाळ वातावरण होते. तर शहराच्या मध्यवर्ती भागात दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. सलग चौथ्या दिवशी कोरेगाव पार्क, मगरपट्टा भागात उष्णतेचा पारा 40 शी पार होता.
दरम्यान, पुढील तीन दिवस शहरातीक कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, कमाल तापमान 40 ते 42 अंशापर्यंत जाईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दिवसभर आकार निरभ्र तर सायंकाळी ढगाळ हवामान राहण्याची शक्यात वेधशाळेने वर्तविली.
शहरातील काही प्रमुख केंद्रावरील कमाल तापमान –
शिरूर 42, ढमढेरे 41.7, पुरंदर 40.9, मगरपट्टा 40.2, कोरेगाव पार्क 40.1, वडगावशेरी 39.7, बारामती 39.5, चिंचवड 39, हडपसर 38.8, शिवाजीनगर आणि एनडीए 38.5, पाषाण 38.3, हवेली 37.8, भोर 35.4. लवासा 35