पुणे – अवकाळी पावसानंतर शहरातील किमान तापमानात दोन अंशाने घट झाली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर थंडी पुन्हा जाणवू लागली आहे. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मागील 24 तासात हवामानत बदल झाला आहे.
शहरात आज कमाल तापमान 31.6 तर किमान तापमान 17.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तीन दिवसांपूर्वी किमान तापमान 20 अंशापर्यंत पोहचले होते.
दरम्यान, पुढील दोन दिवसात शहरातील किमान तापमानात आणखीन घट होणार असल्यामुळे थंडीचा जोर वाढेल. तर पहाटे धुके पडेल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.