पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत गुन्हेगारास शिताफिने अटक करुन त्याचेकडून मोटारसायकल, लॅपटॉप, मोवाईल, टि.व्ही, कॅमेरा असा ऐवज जप्त करुन एकुण 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. वैजनाथ संमुखराव (रा. आरवी, तानाजी नगर ता.भोर जि.पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्षय रघुनाथ धनवडे (23, सध्या रा. सिंहगड कॅम्पस आंबेगाव बु) यांनी तक्रार दिली होती की, चोरटयाने राहते फ्लॅटचा दरवाजा अर्धवट उघडा असताना एक बॅग व त्याचेमधील लॅपटॉप, तीन मोबाईल आणि रोख मिळून एकुण 35 हजार 300 रुपयाचा माल चोरुन नेला आहे.
या गुन्हयाचा तपास करताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व धनाजी धोत्रे यांना खबर मिळाली की, वरील चोरी सराईत गुन्हेगार अमर संमुखराव याने केलेली असून तो स्वामी नारायण मंदीर परिसरात फिरत आहे. त्यानूसार सापळा लाऊन त्याला एका दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे चौकशी केली असता, एक चोरीचा मोबाईल तसेच त्याचेकडे असलेली स्प्लेंडर दुचाकी ही सुध्दा चोरीची असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहरात केलेले इतर नऊ गुन्हेही उघडकीस आले आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, तपास पथकांचे अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार, हर्षल शिंदे, आकाश फासगे, गणेश शेंडे, विक्रम सांवत, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, अवधुत जमदाडे, तुळशीराम टेंभुर्णे यांचे पथकाने केली.