नवी दिल्ली – सूर्याचे आतापर्यंतचे सर्वात जवळून काढलेले छायाचित्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. जवळपास ईएसए-नासाच्या सोलर ऑर्बिटरने 4 तासांमध्ये सूर्याच्या विविध छटांची छायाचित्रे काढण्यात आलेली आहेत. 7.40 कोटी किलोमीटर अंतरावरून दिसू लागल्या ज्वाळा तेव्हाच छायाचित्र काढण्यास सुरुवात झाली. यात सूर्याची फूल डिस्क इमेज म्हणजेच पूर्ण गोळय़ाचे छायाचित्र दिसून येत आहे. नासा आणि युरोपीय अंतराळ संस्थेच्या (ईएसए) सोलर ऑर्बिटरने 7 मार्च रोजी हे छायाचित्र टिपले आहे.
View this post on Instagram
छायाचित्र अंतराळ यानाच्या एक्सट्रीम अल्ट्राव्हायोलेट इमेजरद्वारे काढण्यात आले आहे. सूर्यावर असलेल्या विविध वायूंचे वेगवेगळे तापमान असते. तर छायाचित्रांमध्ये पर्पल रंगाचा गोळा हायड्रोजन गॅस दर्शवित आहे. याचे तापमान 10 हजार अंश सेल्सिअस आहे
हा 25 छायाचित्रांचा एक मोजेक असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. यात आउटर ऍटमॉस्फियर आणि कोरोना एकत्र दिसून येत आहेत. हे छायाचित्र टिपण्यास 4 तासांहून अधिक वेळ लागला आहे, कारण या छायाचित्राची प्रत्येक टाइल्स तयार होण्यास सुमारे 10 मिनिटांचा कालावधी लागला आहे. यात प्रत्ये ठिकाणी छोटय़ा-छोटय़ा असंख्य ज्वाळा दिसून येत असून याद्वारे अंतराळ हवामानाची भविष्यवाणी करण्यास मदत होणार आहे.