लाखेवाडी छावणीतील सकस आहारामुळे दुभत्या जनावरांच्या दुधात वाढ

रेडा (ता. इंदापूर) : राज्यभर जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या,यामध्ये कित्येक ठिकाणी निधी लाटण्याचे प्रकार झाले. परंतु पुणे जिल्ह्यात सर्वात जनावरांची संख्या मोठी असणारी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील चारा छावणीत जनावरांना हिरवा चारा व सकस आहार तसेच योग्य खुराक मिळत असल्याने चक्क जनावरांच्या छावणीतील दुभत्या जनावरांच्या दुधात वाढ झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की लाखेवाडी येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. या चारा छावणीत जवळपास अडीच हजार जनावेर छावणीत दाखल आहेत. राज्यात सर्व भागात पाऊस पडत असताना इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पशुधन टिकवणे जगवणे शेतकऱ्यांना जिकिरीचे झाले आहे, त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त जनावरांची संख्या इंदापूर तालुक्यात आहे परंतु जनावरांना शेतात ओला सुखा चारा उपलब्ध नसल्यामुळे ही जनावरे छावणीकडे वळाली आहेत.

वालचंद नगर बावडा या रस्त्यावरती लाखेवाडी गाव असून या भागात तब्बल 30 ते 35 गावांचा समावेश होतो व ही गावे लाखेवाडी गावापासून लगतची आहेत, याच गावातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या छावणीत दाखल केली आहेत त्यामुळे जनावरांची संख्या मोठी असणारी छावणी म्हणून या छावणीकडे पाहिले जाते.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीमंत ढोले हे छावणीला पुरवल्या जाणाऱ्या ओल्या चाऱ्याची पाहणी स्वतः करतात व ओला चारा घेताना त्याचे वजन परिपक्वता याची पाहणी चाचणी केली जाते. त्यामुळे या लाखेवाडी येथील चारा छावणीत दिला जाणारा ओला चारा पूर्णपणे जनावरांना खाण्यायोग्य लाभत आहे. तर खुराक एका नामांकित कंपनीने तयार केलेले पशुखाद्य या चारा छावणीत पुरवले जाते त्यामुळे दूध देणाऱ्या जनावरांचे दूध चारा छावणीत वाढले असून, याबदल शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. गुलाबराव भानुदास खराडे यांचे कुटुंब मोठे असून या शेतकऱ्यांची तब्बल 36 जनावरे या छावणीत दाखल आहेत, जर भवानीगड विकास प्रतिष्ठानने चारा छावणी सुरू केली नसती तर आम्हाला जनावरे सांभाळता आली नसती अशी माहिती शेतकरी गुलाबराव खराडे यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)