#SLvsBAN : श्रीलंकेसमोर विजयासाठी 239 धावांचे लक्ष्य

मुश्‍फिकूर रहिमचे शतक थोडक्‍यात हुकले

कोलंबो  – श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीनंतर मुश्‍फिकुर रहिम आणि मेहंदी हसन मिर्झायांच्या फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 238 धावांची मजल मारत श्रीलंकेसमोर विजयासाठी 239 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

मुश्‍फिकुरने फटकेबाजी करत नाबाद 98 धावा करत बांगलादेशला 238 धावांची मजल मारून दिली. बांगलादेशकडून मुश्‍फिकुरने सर्वाधिक नाबाद 98 तर मेहंदी हसन याने 43 धावा केल्या.  मुश्‍फिकुर आणि मेहंदी हसन यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.  तमीम इकबालने 19, सौम्य सरकारने 11 आणि मोहम्मद मिथूनने 12 धावा केल्या. श्रीलंकेकडून गोलंदाजीत नुवाम प्रदीप, इसुरू उदाना आणि अकिला धनंजय यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.