वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना 2020च्या निवडणुकीत मिळालेल्या प्रत्येक मताने वैद्यकीय काळजी हा हक्क आह, ते उपकार नाहीत, हेच दाखवून दिले आहे, असे सांगत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी माफक दरांत आरोग्य सेवेच्या कायद्याबाबत आपली भूमीका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतांनी आम्ही निवडणूक जिंकली आहे. त्याने हेच दाखवून दिले आहे, असे ट्विट हॅरिस यांनी केले आहे. बराक ओबामा यांनी लागू केलेला कायदा ट्रम्प यांनी मोडित काढला, त्या पार्श्वभूमीवर हॅरिस यांच्या वक्तव्याला महत्व आहे.
आपण निवडून आल्यावर अमेरिकन संसदेसह वैद्यकीय सुविधेसाठी पहिल्या दिवशीपासून कार्यरत होऊ, असे आश्वासन बायडेन यांनी दिले होते. बायडेन 20 जानेवारीपासून आपला कार्यभार सांभाळण्याची शक्यता आहे. माफक दरात वैद्यकीय सेवा कायदा रद्द करण्याने देश पुन्हा मागास होईल अशी टीकाही हॅरिस यांनी यापुर्वी ट्रम्प प्रशासनावर केली होती.