वॉशिंग्टन – अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्तेवर आल्यानंतरच्या पहिल्या शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की पहिले म्हणजे देशातील नागरिकांनी पहिले शंभर दिवस पूर्ण मास्क वापरण्याचा उपक्रम सुरू करणार आहोत.
या शंभर दिवसांत किमान शंभर दशलक्ष लोकांना करोना लसीचा डोस दिला जाईल आणि अमेरिकेतील बहुतांशी शाळा आपण या शंभर दिवसांत सुरू करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील सुमारे दीड कोटी लोकांना करोनाची बाधा झाली असून 2 लाख 86 हजार लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी सध्या अजून वाढतानाच दिसतो आहे त्यामुळे करोनाशी मुकाबला हा नवीन अध्यक्षांचा पहिला कार्यक्रम असणार आहे.