वाराणसी – ज्ञानव्यापी मशिदीच्या आवारातील “शिवलिंग’ असल्याचा दावा केलेल्या कथित शिवलिंगची कार्बन डेटिंग करण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा निर्णय याचिकाकर्त्यांसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात शिवलिंगाची कार्बन डेटिंग करण्याची मागणी हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती.
वाराणसी न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने कथित शिवलिंग सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कार्बन डेटिंग दरम्यान कथित शिवलिंगाला काही नुकसान झाल्यास ते आदेशाचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या भावनांना धक्का बसू शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
याआधी वाराणसी हायकोर्टाने Places Of Workship Act 1991 कडे दुर्लक्ष करत ज्ञानव्यापी प्रकरण सुनावणी योग्य मानले होते. त्यानंतर या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. याच दरम्यान, हिंदू पक्षकारातील चार महिलांनी याचिका दाखल करत कार्बन डेटिंग करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. श्रृंगार गौरी पूजेस मंजुरी देण्याच्या मागणीवर दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटातील ‘या’ आमदाराची सुरक्षा वाढवली, शिंदे गटात प्रवेश करणार? https://t.co/L9vwVBOnIP
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022
कार्बन डेटिंग म्हणजे काय?
एखादी वस्तू किती जुनी आहे, त्याचा कालावधी निश्चित करण्यात येणाऱ्या वैज्ञानिक चाचणीला कार्बन डेटिंग असे म्हणतात. यामध्ये 20 हजार वर्ष जुन्या वस्तूंच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकतो. कार्बन डेटिंग चाचणीचा शोध 1949मध्ये लागला होता. कार्बन डेटिंगमुळे ज्ञानव्यापी मशिदीच्या आवारात आढळलेले शिवलिंग कोणत्या कालावधीतील आहे, याचा अंदाज वर्तवता येऊ शकते.