टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) सुरु होण्याअगोदर भारताला जसप्रीत बुमराहच्या न खेळण्याने मोठा धक्का बसला. बुमराहच्या त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही हे बीसीसीआयने पूर्वीच स्पष्ट केले. मात्र त्याच्या जागी कोणाला संघात संधी दिली जाणारा याबाबत मात्र बीसीसीआयकडून सस्पेन्स ठेवण्यात आला होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया गेला तरीही बुमराहच्या जागी कोण खेळणार हे ठरले नव्हते. मात्र आता याबाबत बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या ( Mohammad Shami ) नावाची घोषणा केली आहे.
मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) २०२१ च्या टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) स्पर्धेत खेळला होता. मात्र त्यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही. त्यामुळे तो आता या मोठ्या स्पर्धेत भारतासाठी बुमराहची कमतरता भरून काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शामिल आगोदर या स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते. मात्र बुमराहच्या दुखापतीमुळे त्याला आता १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.
T20 World Cup | टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात फक्त विराट कोहलीच्याच नावावर ‘हा’ भीमपराक्रम…
तसे पहिले तर शमीला ( Mohammad Shami ) ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. त्याच्या या अनुभवामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले असावे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात ( T20 World Cup ) मोहम्मद शमीची कामगिरी काही खास राहिली नव्हती. मात्र यंदाच्या स्पर्धेत बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
🚨 NEWS 🚨: Shami replaces Bumrah In India’s ICC Men’s T20 World Cup Squad. #TeamIndia | #T20WorldCup
Details 🔽https://t.co/nVovMwmWpI
— BCCI (@BCCI) October 14, 2022
मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांचा स्टॅन्ड बाय खेळाडू म्हणून समावेश
शमी व्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांच्या बॅकअप खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. दोघांनीही साऊथ आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय मालिकेत चांगली गोलंदाजी केली होती. मोहम्मद सिराजला त्याच्या चांगल्या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कार देण्यात आला. शार्दूल ठाकूर हा त्याच्या गोलंदाजीसोबतच खालच्या तळातील फलंदाज म्हणूनही संघाच्या कमी येऊ शकतो. त्याच्याकडे मैदानात येताच मोठे फटके खेळण्याचे कौशल्य आहे.
Karwa Chauth | भारतीय क्रिकेटपटूंच्या बायकांनी ‘असा’ साजरा केला करवा चौथ, पाहा व्हिडिओ…
टी-२० विश्वचषकासाठी ( T20 World Cup ) भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.