मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यांची तब्बेत स्थीर असल्याने आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 24 ऑक्टोबर रोजी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते.
सेंट जॉर्ज रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचे 10 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत.
“फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले”
रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर बाहेर येताच त्यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजनही होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती.
पोलीसांनी मला मारलं – अर्णब गोस्वामी
देवेंद्र फडवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही 93 पर्यंत खाली आली होती. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 97 पर्यंत वाढली. गेल्या रविवारी आणि सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते, असेही डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले.