नवी दिल्ली – चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंचा प्रवेश जागतिक क्रिकेटमध्येही झाला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनची करोना विषाणू तपासणीसाठी करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी निगेटिव्ह आली आहे. 28 वर्षीय फर्ग्युसनला आजारपणाची लक्षणे जाणवू लागल्याने त्याला तातडीने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
त्याच्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसन करोनाने बाधीत झाल्याचे गुरुवारी सांगण्यात आले होते. मात्र, त्याच्या चाचणीचा अहवाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून तो चाचणीत निगेटिव्ह ठरला आहे.
दरम्यान, चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंच्या धोक्यामुळे ऑस्ट्रेलिया विरूध्द न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील उर्वरीत दोन सामने रद्द करण्यात आले आहेत. तसेच या मालिकेनंतर होणारा ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौराही पुढे ढकलण्यात आला आहे.