मुंबई – आज पासून 2022 वर्ष संपणार असून, सर्वच जण 2023 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. नवीन वर्षात सर्वच लोक नवनवे संकल्प करत असतात. अश्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यांनी देखील 2023 या नवीन वर्षाचा एक संकल्प केल्याचं दिसून येत आहे. आपल्या अधिकृत ट्विटवर अकाऊंटवरून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
New Year starting tomorrow
“19 bungalows of Thackeray Family
Anil Parab Sai Resort
Hasan Mushrif
Aslam Khan’s 49 Studios
Kishori Pednekar SRA Flats
Mumbai Municipal Corporation ”
GHOTALO ka Hisab Pura Karenge @BJP4India @mieknathshinde pic.twitter.com/KGI3B3Dqx6
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 31, 2022
या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केलेत. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. त्यांनी पाच नेत्यांची नावं सांगितलं आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं साई रिसॉर्ट प्रकरणही किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर असणार आहे.
यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात किरीट सोमय्या कोणता धमाका करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून, अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.