नगर : पुन्हा नवा उच्चांक..!

नगर 2,233 जिल्ह्यात आज 15 करोनाबळी

नगर – नगर जिल्ह्यात आज करोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा आत्तापर्यंतच्या इतिहासातील नवा उच्चांक स्थापित झाला. आज तब्बल 2 हजार 233 नवे रुग्ण सापडले आहेत. ‘ब्रेक द चेन’साठीचे निर्बंध कडक केल्यानंतरही नवीन रुग्णवाढ अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. त्यात करोना निर्बंधावर काम करणारे जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी दर्जाचे वरिष्ठ अधिकारीही करोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने नवीनच पेच निर्माण होण्याची भीती व्यक्त आहे.

नगर शहरातील नालेगाव अमरधामध्ये अंत्यविधीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयांमधून पाठविण्यात येणार्‍या करोनाबाधित मृतेहदांची संख्याही रोज वाढत आहे. तथापि, त्याची आकडेवारी दररोज पाठविण्यात येत असलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये दिसत नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. आजच्या मेडिकल बुलेटीनमध्ये 15 जण करोनाबळी ठरल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तथापि, अशा वातावरणातही बाजारपेठ उघडण्यासाठीचा दबाव वाढत आहे. त्यातही आपण मांडत असलेली भूमिकाच कशी रास्त? असा राजकीय धुराळा कायम असल्याने नागरीक गोंधळात आहेत. कडक निर्बंधांचे समर्धन करावे की विरोध, अशा द्विधा मनस्थितीत असलेल्यांची संख्याही जास्त आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यात आज 1 हजार 319 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 96 हजार 494 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 88.20 टक्के इतके झाले आहे. आज जिल्ह्याच्या रूग्णसंख्येत 2 हजार 233 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 11 हजार 637 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 859, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 549 आणि अँटीजेन चाचणीत 825 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 271, अकोले 103, जामखेड 08, कर्जत 37, कोपरगाव 64, नगर ग्रामीण 36, नेवासा 12, पारनेर 38, पाथर्डी 29, राहता 10, राहुरी 07, संगमनेर 151, शेवगाव 26, श्रीगोंदा 21, कँटोन्मेंट बोर्ड 38, मिलिटरी हॉस्पिटल 06 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 202, अकोले 09, जामखेड 03, कर्जत 04, कोपरगाव 29, नगर ग्रामीण 39, नेवासा 05, पारनेर 08, पाथर्डी 22, राहाता 84, राहुरी 07, संगमनेर 44, शेवगाव 26, श्रीगोंदा 06, श्रीरामपूर 47, कँटोन्मेंट बोर्ड 04 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 825 जण बाधित आढळुन आले. मनपा 138, अकोले 16, जामखेड 36, कर्जत 160, कोपरगाव 06, नगर ग्रामीण 112, नेवासा 38, पारनेर 24, पाथर्डी 63, राहाता 23, राहुरी 93, संगमनेर 03, शेवगाव 51, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 32, कॅन्टोन्मेंट बोर्ड 12 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 362, अकोले 63, जामखेड 32, कर्जत 50, कोपरगाव 144, नगर ग्रामीण 58, नेवासा 100, पारनेर 28, पाथर्डी 65, राहाता 63, राहुरी 51, संगमनेर 64, शेवगाव 53, श्रीगोंदा 34, श्रीरामपूर 91, कॅन्टोन्मेंट 39, मिलिटरी हॉस्पिटल 02, इतर जिल्हा 19 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या : 96494
उपचार सुरू असलेले रूग्ण : 11637
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 1270
एकूण रूग्ण संख्या : 1,09,401

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.