पुण्यासाठी लवकरच नवीन पालकमंत्री

नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांची माहिती

पुणे – लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरातील जनतेने मोठी साथ दिली. पुणे जिल्ह्यातही आम्हाला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला. त्याबद्दल त्यांचे आभार. फक्त बारामती मतदारसंघात आमची ताकद थोडी कमी पडली. स्वत: प्रचारात अडकल्याने मला जास्त वेळ देता नाही, अशी खंत नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आज येथे व्यक्त केली. पुण्याचा पालकमंत्री पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील विजयानंतर बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करत पुणे शहराच्या विकासाबद्दल विविध मुद्दे स्पष्ट केले. दरम्यान,

आता पालकमंत्री कोण असणार, या प्रश्‍नाला उत्तर देताना बापट म्हणाले, “माझ्यापेक्षा चांगले काम करणारा पालकमंत्री तुम्हाला मिळणार आहे.’कसबा विधानसभा मतदारसंघाचा उत्तरधिकारी कोण असेल, त्यावर ते म्हणाले, “आजवर राजकीय जीवनातील प्रत्येक निर्णय सर्वांना सोबत घेऊन केला आहे. त्यामुळे कसब्याचा उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णयदेखील सर्वजण मिळून घेऊ.’

पवारांना टोला
“प्रत्येक भाषणात मावळमध्ये कोण निवडून येणार हे सांगितले होतेच’, असे सांगून बापट यांनी, “अशी घराणेशाही आणि राजकीय परिपक्वता नसताना केवळ कोणीतरी कोणाचा नातू, मुलगा आहे म्हणून त्याला राजकीय जीवनात स्थान देणे योग्य नाही. त्याची गुणवत्ता असेल तर जरूर द्यावे परंतु ते सिद्धही करून दाखवावे लागते,’ असा टोला गिरीश बापट यांनी पार्थ पवार यांच्या पराभवाच्या निमित्ताने पवार कुटुंबाला लगावला. तर राजकारणात नगरमधून सुजय विखे यांनी स्वतःला सिद्ध केल्याचे सांगत त्यांचे कौतुकदेखील केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.