नवी दिल्ली : कोरोनाबाधीतांची देशातील संख्या मंगळवारी 125वर पोहोचली. मंगळवारी नव्या 11 बाधितांमध्ये भर पडली. या 125 जणांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. सोमवारी ही संख्या 114 होती. तर 13 जण या बाधेतून बरे झाल
मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजता आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर दाखवलेल्या माहिती नुसार महाराष्ट्रात 39 जण बाधीत असून त्या पाठोपाठ केरळात 24 जणांना लागण झाली आहे.
राज्यस्तरीय स्थिती :
आंध्र प्रदेश – एक, दिल्ली -सात, कर्नाटक -8, महाराष्ट्र -39, हरियाणा – 15, ओडिशा – 1, पंजाब – 1, राजस्थान – 4, तामिळनाडू – 1, तेलंगणा – 4, जम्मू काश्मिर – 3, लडाख – 4, उत्तर प्रदेश – 12, उत्तराखंड – 13, केरळ – 24 अशी नाधीतांची संख्या आहे. आतापर्यंत विमानतळावर 13 लाख 19 हजार 363 प्रवाशांची तपासणी केली आहे.
भारतात अफगाणीस्तान, फिलीपाईन्स, मलेशियातून प्रवाशांना 31 मार्चपर्यंत येण्यास मंगळवारी मनाई करण्यात आली. त्याबरोबर याआधी मनाई केलेल्या देशांतील प्रवासांवरील निर्बंध कायम राहणार आहेत.