वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (थकज) ने करोना विषाणू जागतीक साथ म्हणून जाहीर केले आहे. करोना विषाणूमुळे बरेच इव्हेंट्स, अवॉर्ड फंक्शन्स, मुलाखती आणि शूटिंग रद्द करण्यात आले आहे. आता याबाबत जनजागृती करण्यासाठी डब्ल्यूएचओमार्फत सेफ हॅंड्स चॅलेंज या नावाने एक नवीन मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत, या विषाणूंपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपण आपले हात कसे धुवावे यासाठी एक व्हिडिओ शेअर करण्यास सांगितले जाणार आहे.
या चॅलेंजसाठी बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोन यांनाही नॉमिनेट करण्यात आले आहे. हे चॅलेंज घेऊन जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डब्ल्यूएचओच्या संचालकांनी जगभरातील अनेक सिलेब्रिटीज नामांकित करण्यात आले आहेत. यात के-पॉप, अर्नोल्ड श्वार्जनेगर, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण यांच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तींचे नामांकन केले आहे.
याबाबत करण्यात आलेल्या ट्विटमध्ये असे लिहिण्यात आले की, आता सेफ हॅंड चॅलेंजसाठी मी @deepikapadukone @priyankachopra यांना नॉमिनेट करत आहे. जे एक व्हिडिओ शेअर करून हात कशा प्रकारे धुतले पाहिजेत आणि ते अन्य तीन जणांना हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी आवाहन करतील. आपण सर्वजण मिळून ञ्चउजतखऊ19चा अंत करू शकतो.