पुणे – शहरात गेल्या 24 तासांत नवीन 61 करोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 878 वर गेली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 50 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील विविध रूग्णालयत एकूण 1 हजार 150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 76 जणांची प्रकृती चिंताजनक असून, ससून रूग्णालय, भारती हॉस्पीटल, सिम्बॉयसिस, नायडू यासह खासगी रूग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 483 जणांना घरी सोडण्यात आले आहे.