नेवासा – श्रीरामपुर राज्य मार्गावरील साईनाथनगर ते नेवासा बुद्रूक येथील मधल्या रस्त्यावर साईनाथनगर शिवारात केळी व्यापाऱ्यांचा टेम्पो पलटी होवून एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार (दि.२४) रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली या अपघाची माहिती मिळताच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय करे व पोलिस नाईक बबन टमनर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचार्थ हलविण्यासाठी मदत कार्य सुरु केले.
जखमींवर नेवासा फाटा येथील साईसेवा मस्टीस्पेशालिटी हॉस्पिटमध्ये उपचार सुरु आहेत.या अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण जखमी झालेले असून जखमींमधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती वैद्यकिय सुञांनी दिली.
याबाबत अधिक सविस्तर माहीती अशी की,खुलताबाद (जि.औरंगाबाद) येथील केळी व्यापाऱ्यांचा टेम्पो केळी आणण्यासाठी नेवाशाकडे येत असतांना साईनाथनगरहून नेवासा बुद्रूककडे येत असतांना हा टेम्पो रस्त्यावर अचानक पलटी झाला या टेम्पोने दोन पलट्या घेतल्यामुळे हा अपघात झाला या अपघातात खलिल छोटू बेग (वय ५६) रा.खुलताबाद (जि.औरंगाबाद) हा इसम जागीच ठार झाला तर मिर्झा युन्नस शेख (वय ४२),मिर्झा बब्बु शेख (वय ३५)इम्रान शेख (वय २८),सोहेल सलिम शेख (वय २१),मुक्तार अहेमद शेख (वय ३५),मिर्झा फैंग बेग (वय २४),इब्राहिम शेखचंद शेख (वय ३५),मिर्झा फरुद्दीन बेग (वय २२) सर्व राहणार खुलताबाद (जि.औरंगाबाद) येथील आहेत अपघातात एका जणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती वैद्यकिय सुञांनी दिली.
या अपघाताची माहीती मिळताच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय करे व पोलिस नाईक बबन टमनर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून जखमींना औषधोपचारासाठी दाखल करण्यास मदत केली तर जखमींची पोलिस निरिक्षक करे यांनी हॉस्पिटलमध्ये येवून पाहणी केली अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहीती यावेळी पोलिस सुञांनी दिली आहे अपघातातील मयत खलील छोटू बेग या मृतक इसमाचे शवविच्छेदन करण्यासाठी शव नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात सुरु असून जखमींवर साईसेवा मल्टील्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.