नवी दिल्ली : सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने पावो नुर्मी गेम्स 2022 मध्ये 89.03 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. शिवाय त्याने स्वतःचाच विक्रमही मोडीत काढत नवा विक्रम केला आहे. या स्पर्धेत त्याचे सुवर्णपद हुकले आहे.
या स्पर्धेतील सुवर्णपदक फिनलंडच्या ऑलिव्हर हेलँडरने पटकावले.ऑलिव्हरने 89.83 मीटर अंतरावर भालाफेक केली. टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्राची ही पहिलीच स्पर्धा होती. 10 महिन्यांनंतर तो एका स्पर्धेत उतरला आहे. यादरम्यान, त्याने आपले पूर्ण लक्ष प्रशिक्षण आणि पुनर्प्राप्तीवर केंद्रित केले.
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.07 मीटर फेक केली. हीटमध्ये तो पाचव्या क्रमांकावर होता. अंतिम फेरीत त्याने ८६.९२ मीटर फेकने सुरुवात केली. पहिल्या फेरीतील त्याचा हा सर्वोत्तम प्रयत्न होता. २४ वर्षीय नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात ८९.३० मीटर अंतरावर भालाफेक करून स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८८.०७ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते.
नीरज चोप्राने प्रथमच ८९ मीटरचा टप्पा गाठला आहे. यापूर्वी, त्याचा सर्वोत्तम थ्रो 88.07 मीटर होता, जी त्याने गेल्या वर्षी पटियाला येथे भारतीय GP दरम्यान केली होती.