लोणी काळभोर- डॉक्टर म्हटले की धावपळ, क्षणाक्षणाला जीवन मृत्यूचा लपंडाव… रुग्णाचा जीव वाचला की समाधान आणि प्रयत्न करून ही यश नाही आले की येणारे नैराश्य….. रोजचाच खेळ अशा प्रकारे प्रत्येक डॉक्टरच्या आयुष्यात सुख दुःखाचा लपंडाव सुरू असतो.
त्यातून काही क्षणांची विश्रांती घेण्यासाठी आणि बुद्धीला नव चैतन्य, उत्साह आणि चालना देण्यासाठी विविध खेळांच्या स्पर्धा होण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ. डी. एन. हंबीरे यांनी व्यक्त केले. पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या वतीने रूरल डॉक्टर प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा गेली चार वर्षे आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धेत विविध डॉक्टर असोसिएशनच्या 20 संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा 24 जानेवारीपर्यंत स्पोर्टस डिझायर कार्पोरेशन ग्राउंडवर चालणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. डी. एन. हंबीरे, डॉ. धूत, डॉ. देशमुख, डॉ. दरक, डॉ. सटाले आदींच्या उपस्थितीत पार पडला. लिगचे अध्यक्ष डॉ ओमकुमार हलिंगे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. राहुल काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. अनिल देशपांडे यांनी केले. यावेळी असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन चौधरी, सचिव डॉ. रतन काळभोर, उपाध्यक्ष डॉ. नागेश गवते, खजिनदार डॉ. नितीन मटकर, डॉक्टर उपस्थित होते.