India Vs Australia 4th T20I Cricket Match Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधायची आहे.
भारत विरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने सांगितले की, त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 बदल करण्यात आले आहेत. तर भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 बदल केले आहेत. जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे. इशान किशनला ब्रेक देण्यात आला आहे. मुकेश कुमार परतला आहेत.
🚨 Toss Update 🚨
Australia win the toss and elect to bowl in Raipur.
Follow the Match ▶️ https://t.co/iGmZmBsSDt#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GD0PhQIepF
— BCCI (@BCCI) December 1, 2023
दोन्ही संघाचे Playing 11 खाालीलप्रमाणे –
ऑस्ट्रेलिया : जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कर्णधार/यष्टीरक्षक), बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.
भारत : यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार.
IND vs AUS 4TH T20 : ऑस्ट्रेलियानं Toss जिंकला; कर्णधार मॅथ्यूनं घेतला ‘हा’ निर्णय..
दरम्यान, टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना दोन विकेटने जिंकला. तर दुसरा सामना भारताने 44 धावांनी जिंकला. मात्र, तिसऱ्या सामन्यात भारताला पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आता हा सामना जिंकून मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
IND vs AUS 4TH T20 : आज जर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर Team India ‘या’ बाबतीत होईल नंबर 1…
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधायची आहे. तिसर्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणारा ग्लेन मॅक्सवेल आपल्या देशात परतला आहे. अशा परिस्थितीत संघाला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूंवर असेल.